लोकार्थ प्रतिनिधी
११ भारतीय खलाशी जखमी
ओमानच्या किनारपट्टीवर एमटी ऑन पीस या पनामाचा ध्वज असलेल्या व्यापारी जहाजावर मंगळवारी क्षेपणास्त्र हल्ला झाला. होर्मुझच्या सामुद्रधुनीमधून जात असताना झालेल्या या हल्ल्यात १२ क्रू मेंबर्स जखमी झाले असून, त्यामध्ये ११ भारतीय खलाशांचा समावेश आहे, अशी माहिती परराष्ट्र मंत्रालयाने दिली आहे. इंडिया टुडेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे. जखमी कर्मचाऱ्यांना ओमानच्या अधिकाऱ्यांच्या मदतीने सुरक्षित बाहेर काढण्यात आलं असून, ओमानमधील खसाब येथे त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू आहेत. या जहाजावरील एकूण १९ कर्मचाऱ्यांपैकी १७ जण भारतीय नागरिक आहेत. भारताने या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून मदतीबद्दल ओमान प्रशासनाचे आभार मानले आहेत

No Comment! Be the first one.