लोकार्थ प्रतिनिधी
जालना: भोकरदनजवळील पाणीपुरवठा करणाऱ्या धरणात केवळ पाच टक्के पाणी साठा उरला असून, याच महिन्यात भोकरदन शहराला टँकरने पाणी द्यावे लागेल अशी परिस्थिती आहे. राखीव पाणीसाठा सुरक्षित ठेवण्याबाबत जागृती व्हावी आणि पाणी चोरी होऊ नये म्हणून धरण परिसरात पोलीस आणि जलसंपदा विभागाने गस्त सुरू केली आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक सचिन खामगळ यांनी यांनी ही माहिती दिली. एखाद्या धरणातलं पाणी सुरक्षित ठेवण्यासाठी पोलिस गस्त घालण्याचा हा पहिलाच प्रसंग असावा. जालना जिल्ह्यात भोकरदन आणि घनसावंगी या दोन तालुक्यात पिण्याच्या भीषण टंचाइ आहे. त्यामुळे पाणी राखून ठेवण्यासाठी बाष्पीभवन रोखण्याची मागणीही जोर धरू लागली आहे.

No Comment! Be the first one.