लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : जुना मोंढा परिसरातील जाफर गेट येथील बजरंग ट्रेडिंग कंपनीच्या ऑईल रिपॅकिंग युनिटवर अन्न व औषध प्रशासनाने १२ ऑक्टोबर रोजी छापा टाकून २३ लाख ३५ हजार ६५४ रुपयांचे खाद्यतेल जप्त केले. या कारवाईत १२ हजार ३८२ किलो सोयाबीन व पामोलीन तेलाचा साठा जप्त करण्यात आला असून, कंपनीचा अन्न परवाना तात्काळ प्रभावाने निलंबित करण्यात आला आहे.
तपासणीत अस्वच्छता, तेलाची गळती, कीटक व उंदरांना प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक उपाययोजनांचा अभाव, कामगारांच्या सुरक्षेकडे दुर्लक्ष तसेच तेल खरेदीच्या नोंदी नसल्याचे आढळले. स्वच्छता व अन्नसुरक्षा निकषांच्या तपासणीत कंपनीला २०६ पैकी केवळ १० गुण मिळाले. अन्न सुरक्षा अधिकारी कीर्तिका झाडे यांनी ही कारवाई केली. जप्त केलेला साठा पुढील आदेशापर्यंत सील करण्यात आला आहे.
No Comment! Be the first one.