आपल्या विद्यार्थिनीचे शोषण करत असल्याचा आरोप..
लोकार्थ प्रतिनिधी जयपाल ठाकूर
लातूर शहरातील एमआयडीसी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वादग्रस्त बशीर शेख याचे आदर्श कॅम्पस (१ ली ते १० वी व खासगी शिकवणी वर्ग) आहे. इथे मोठ्या प्रमाणात विद्यार्थी शिक्षण घेतात. वादग्रस्त संस्थाचालक कम प्राचार्य बशीर शेख याने २० सप्टेंबर रोजी अंगावरील शर्ट काढायला लावून तिचा विनयभंग केला. त्या विद्यार्थीनीस स्वतःच्या खासगी पार्टला स्पर्श करायला लावून विनयभंग केला. तो वादग्रस्त बशीर शेख हा अनेक विद्यार्थीनींसोबत असे अश्लील प्रकार करित होता. अनेक विद्यार्थीनींसोबत असे अश्लील प्रकार करित होता. मुलींच्या पालकांमध्ये याबाबत मोठी दहशत निर्माण झाली होती.
अखेर एका मुलीने धाडस केले, पोलिसांत तक्रार दिली आणि काल एमआयडीसी पोलिसांत बशीर शेख याच्या विरोधात विनयभंग, पोक्सो व ईतर कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल केला जात आहे याबाबत माहिती होताच बशीर फरार असून पोलिसांनी त्याच्या अटकेसाठी विविध पथके निर्माण केली आहेत.
बशीर शेखला फासावर लटकवा
आदर्श नावाने शैक्षणीक संकूल चालविणाऱ्या बशीर शेख याच्या बाबतीत लैंगीक अत्याचाराबाबत अनेक तक्रारी आहेत. त्याने आपल्या शाळेतील विद्यार्थीनीसोबत चाळे करून शैक्षणीक क्षेत्राला, शिक्षणाची पंढरी असलेल्या लातूरला, गुरू-शिष्याच्या नात्याला काळीमा फासली आहे.
विद्यार्थीनीचे धाडस
आदर्श संस्थाचालक व प्राचार्य बशीर शेख याचे विद्यार्थीनीसोबत असे गैरवर्तन मुली व पालकांसाठी चिंतो विषय बनला होता. तो अनेक विद्यार्थीनींच्या सोबत असेच करायचा. एका विद्यार्थीनीने धाडस करून आपल्या गणवेशात रेकॉडींग चालू करून मोबाईल ठेवला. ज्यामुळे बशीर शेख याचे अश्लील शब्द यात रेकॉर्ड झाले. त्या विद्यार्थीनीनेच आपल्याच शाळेच्या प्राचार्याचा बुरखा फाडला. ही ऑडीओ क्लीप वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांकडे पाठवून या प्रकाराविरूद्ध येथील स्थानिक समाजसेवक आणि युवकांनी पाठपुरावा केला.
फासावर लटकवा अशी मागणी करित होते.
आदर्श कॅम्पसवर आज संतप्त नागरिकांनी मोर्चा काढला. त्यावेळी आदर्श नावावर शाईफेकही करण्यात आली. तसेच याच संस्थेची वसवाडी बार्शी रोड परिसरात एक शाखा आहे. त्या इमारतीच्या काचा रात्री अज्ञातांनी फोडल्याचे सांगण्यात येत आहे.
तसेच या प्रकरणात लातूर जिल्हा वकील मंडळाने बशीर शेख याचे कोणीही वकीलपत्र घेणार नाही अशी घोषणा केली.

No Comment! Be the first one.