लोकार्थ रिपोर्ट चंद्रकांत अंबिलवादे पैठण
पैठण तालुक्यातील बालानगर येथील रहिवासी साईनाथ लक्ष्मण गोर्डे रविवारी रोजी आपेगाव येथून बेपत्ता असल्यामुळे पैठण पोलीस व न.प अग्निशमन पथक शोधकार्य आपेगाव येथील गोदावरी नदीच्या घाटावर करीत असताना. साईनाथ गोर्डे हा साष्टपिंपळगाव ता. अंबड जिल्हा जालना या ठिकाणी सुखरूप असल्याचे निष्पन्न झाले.
आपेगाव येथील गोदावरी नदीच्या घाटावर एका व्यक्तीचे कपडे व मोबाईल ग्रामस्थाला आढळून आल्याने सदरील खबर पैठण पोलीस सपोनि चंद्रकांत पवार, बीट जमादार राजेंद्र जिवडे यांना प्राप्त झाली होती.
घटनेचे गांभीर्य ओळखून सदरील व्यक्तीचा शोध घेण्यासाठी पोलीस व अग्निशमन दलाच्या जवानांनी सोमवार रोजी सायंकाळपर्यंत शोधकार्य चालू असताना अचानक बेपत्ता झालेल्या साईनाथ लक्ष्मण गोर्डे यांनी आपल्या नातेवाईकांना फोनवर संपर्क करून मी साष्टपिंपळगाव ता. अंबड जिल्हा जालना या ठिकाणी सुखरूप असल्याचा निरोप दिल्याने तात्काळ आनंदपुर पोलीस पाटील गोकुळ लगडे व नातेवाईक रात्री साईनाथला आणण्यासाठी रवाना झाली.यासंदर्भात साईनाथ बेपत्ता असल्याची तक्रार पाचोड पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली होती. या व्यक्तीचे कपडे व मोबाईल आपेगाव येथील बीट जमादार राजेंद्र जिवडे यांनी ताब्यात घेतलेले असून दोन दिवसापासून साईनाथ लक्ष्मण गोर्डे अचानक बेपत्ता होण्याचे कारण काय आहे…? या संदर्भात पाचोड सपोनि सचिन पंडित, जमादार राजेंद्र जिवडे अधिक तपास करीत आहे.

No Comment! Be the first one.