लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर छत्रपती संभाजीनगर
छत्रपती संभाजीनगर : वैजापूर तालुक्यातील करंजगाव येथे जागेच्या वादातून हेमंत अंबादास जाधव यांना मारहाण करून त्यांच्या गळ्यातील सुमारे सव्वा दोन तोळ्यांची सोन्याची चैन हिसकावल्याची घटना २ ऑक्टोबरला सायंकाळी घडली. याप्रकरणी सिद्धार्थ लाडू पठारे, कचऱू लाडू पठारे व दोन अनोळखी व्यक्तींविरुद्ध वैजापूर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींनी लाकडी दांड्याने तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचे तक्रारीत नमूद आहे. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

No Comment! Be the first one.