अनुसूचित जमातीच्या निधीची श्वेतपत्रिका जाहीर करण्याची मागणी; आमदार बालाजी कल्याणकरांनी आंदोलनाला दिला पाठिंबा
लोकार्थ प्रतिनिधी बालाजी वैजळे नांदेड
महाराष्ट्रातील अनुसूचित जमातीच्या विकासासाठी करण्यात आलेल्या निधीची तरतूद आणि प्रत्यक्ष खर्च याबाबत सर्वसमावेशक श्वेतपत्रिका जाहीर करावी, या प्रमुख मागणीसाठी आदिवासी कोळी महादेव समाजाच्या वतीने नांदेडमध्ये रॅली काढून बेमुदत शांततामय सत्याग्रह आंदोलन सुरू करण्यात आले आहे.
या आंदोलनाला आमदार बालाजी कल्याणकर यांनी भेट देत आंदोलकांच्या मागण्यांना पाठिंबा दर्शविला. समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन चर्चा करणार असून, आगामी विधानसभा अधिवेशनातही हा मुद्दा ठामपणे मांडणार असल्याचे आमदार कल्याणकर यांनी यावेळी सांगितले.
अनुसूचित जमातीच्या विकासासाठी झालेली आर्थिक तरतूद, प्रत्यक्ष खर्च आणि त्याचा लाभ याबाबत पारदर्शक माहिती जनतेसमोर यावी, अशी आंदोलकांची मागणी आहे.
बाईट : आमदार बालाजी कल्याणकर
No Comment! Be the first one.