गंगापूर प्रतिनिधी
गंगापूर : परिसरात बकरी चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. बकरी चोरी करण्यासाठी आलेल्या चोरट्यांनी पोलिसांची चाहूल लागताच वाहन घटनास्थळीच सोडून पळ काढल्याची घटना समोर आली आहे.
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित वाहन ताब्यात घेतले. वाहनाच्या आधारे चोरट्यांचा शोध घेण्यात येत असून, या प्रकरणाचा पोलिसांकडून तपास सुरू आहे. बकरी चोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, चोरट्यांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
No Comment! Be the first one.