लोकार्थ प्रतिनिधी प्रवीण देशपांडे परभणी
पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीच्या अनुषंगाने अखिल भारतीय मराठा महासंघाची विभागीय बैठक उद्या 7 ऑक्टोबर रोजी परभणी येथे आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीसाठी संघटनेच्या विभागीय पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन धाराजी भुसारे यांनी केले आहे.
23 ऑक्टोबरला होणाऱ्या पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकी संदर्भात ही तात्काळ पदाधिकारी बैठक असून या बैठकीत मराठवाड्यातील
विकासाच्या अनुषंगाने मराठवाड्याचा अनुशेष भरून काढणे, वैधानिक विकास मंडळ, मराठवाड्याचा पाणी प्रश्न तसेच मराठवाड्याच्या औद्योगिकीकरणासाठी भविष्यातील उपयोजना व ज्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. त्यांच्यासाठी काय या विषयावर चर्चा करून येणाऱ्या निवडणुकी संदर्भात काय निर्णय असावा, यासाठी ही तात्काळ बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीस मराठवाडा विभागातील सर्व पदाधिकाऱ्यांनी उपस्थित राहून आपली भूमिका स्पष्ट करावी जेणेकरून सर्वानुमते या बैठकीत निवडणुकी संदर्भात निर्णय घेता येईल. यासाठी सर्व मराठवाड्यातील पदाधिकाऱ्यांनी उपस्थित रहावे असे आवाहन मराठवाडा अध्यक्ष धाराजी भुसारे यांनी केले आहे.

No Comment! Be the first one.