३४३ किलो गांजा, ४९९ बाटल्या कोडीन सिरपचा समावेश
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या आदेशानुसार अमली पदार्थविरोधी मोहिमेत जप्त करण्यात आलेला ४९ लाख २ हजार ८८३ रुपयांचा अमली पदार्थांचा मुद्देमाल कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून नष्ट करण्यात आला.
एमआयडीसी वाळूज, उस्मानपुरा, सिटीचौक, वेदांतनगर, हर्सूल, दौलताबाद, सिडको, बेगमपुरा, सातारा व क्रांतीचौक आदी पोलिस ठाण्यांच्या हद्दीत जप्त केलेल्या मुद्देमालात ३४३ किलो ५७३ ग्रॅम गांजा, ४९९ बाटल्या कोडीनयुक्त औषधी सिरप व चरस यांचा समावेश होता.
जप्त मुद्देमाल महाराष्ट्र एन्व्हायरो पॉवर लि., रांजणगाव (ता. शिरूर, जि. पुणे) येथे शासकीय वाहनातून नेऊन कायदेशीररीत्या नष्ट करण्यात आला. ही कारवाई पोलिस आयुक्त प्रवीण पवार यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
No Comment! Be the first one.