दोघांसह टोळक्यावर जबरदस्तीचा आरोप; पोलिसांकडून तपास सुरू
लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर -चिकलठाणा एमआयडीसी परिसरात एका इंडस्ट्रियल कॉन्ट्रॅक्टरला धमकावून त्याची इनोव्हा कार आणि सव्वातीन लाख रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने घेऊन गेल्याची घटना समोर आली आहे. याप्रकरणी एमआयडीसी सिडको पोलिसांनी सुधीर कातकडे, राहुल चाबुकस्वार यांच्यासह १० ते १२ अनोळखी व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
फिर्यादी ज्ञानेश्वर वारे यांच्या तक्रारीनुसार, ३० सप्टेंबर रोजी चिकलठाणा एमआयडीसीतील महिंद्रा शोरूमच्या मागील गल्लीत हा प्रकार घडला. आरोपींनी धमकावून पांढऱ्या रंगाची इनोव्हा कार (एमएच-20-एफयू-7000) आणि त्यातील सव्वातीन लाख रुपयांची रोख रक्कम जबरदस्तीने नेल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
ही कार व रोख रक्कम राहुल चाबुकस्वार याने लपवून ठेवल्याचा संशय फिर्यादीने व्यक्त केला आहे. तसेच 12 कोटी रुपये कमिशन देण्यासाठी आपल्यावर दबाव टाकला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणाचा पुढील तपास एमआयडीसी सिडको पोलिसांकडून सुरू आहे.

संबंधित बातमीची AI इमेज
No Comment! Be the first one.