लोकार्थ प्रतिनिधी विजय देऊळगावकर
छत्रपती संभाजीनगर : ‘नशामुक्त युवा फॉर विकसित भारत’ अभियानांतर्गत मेरा युवा भारत (MY Bharat) आणि जिल्हा प्रशासनाच्या समन्वयाने रविवारी बिबी का मकबरा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ प्रवेशद्वारापर्यंत ‘नशामुक्त युवा-आरोग्य पदयात्रा’ काढण्यात आली.
सहायक पोलीस आयुक्त (गुन्हे) मजहर सय्यद यांच्या प्रमुख उपस्थितीत झालेल्या या पदयात्रेत विविध शैक्षणिक संस्थांमधील विद्यार्थी, MY Bharat युवा स्वयंसेवक, NSS, NCC स्वयंसेवक, युवा संघटना तसेच सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी सहभागी झाले. ‘एक पाऊल पुढे टाका, व्यसनमुक्त राहा’ आणि ‘Step Up, Stay Addiction-Free’चा संदेश देत युवकांना व्यसनांपासून दूर राहण्याचे आवाहन करण्यात आले.
मजहर सय्यद यांनी नशेच्या दुष्परिणामांची माहिती देत युवकांनी निरोगी जीवनशैली, शारीरिक व्यायाम आणि सकारात्मक सहभागाला प्राधान्य देण्याचे आवाहन केले. ‘निरोगी व व्यसनमुक्त युवा ही विकसित भारताची भक्कम पायाभरणी आहे’, असा संदेश या पदयात्रेतून देण्यात आला.
यावेळी क्रीडा अधिकारी मयुर गोरमे, सहायक पोलीस निरीक्षक सचिन जाधव यांच्यासह अंमली पदार्थ प्रतिबंधक विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

No Comment! Be the first one.