लोकार्थ प्रतिनिधी
रशिया आणि युक्रेनमधील युद्ध पुन्हा एकदा भडकलं आहे. रशियाने रविवारी (४ ऑक्टोबर) युक्रेनवर पुन्हा भीषण ड्रोन हल्ले केले आहेत. या हल्ल्यात युक्रेनमधील भारतीय औषध निर्मिती कंपनीचा एक प्रकल्प पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. या हल्ल्यात एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे. रशियाने केलेल्या या हल्ल्यामुळे युक्रेनमध्ये मोठी खळबळ उडाली आहे. या हल्ल्यानंतर युक्रेननेही प्रत्युत्तर देण्याचा इशारा दिला आहे. या संदर्भातील माहिती युक्रेनचे अध्यक्ष झेलेन्स्की यांनी एक्सवर पोस्ट शेअर करत दिली. या संदर्भातील वृत्त एनडीटीव्हीनं दिलं आहे.

No Comment! Be the first one.